पत्रक

 

शुभेच्छा पत्र

जिथे ऐक्य आहे तेथे शक्ती आहे
जिथे शक्ती आहे तेथे सौख्य आहे
खडे कोट होऊन एकतेचा
धरा मार्ग निःशंक तुम्ही यशाचा

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सर्व ताम्हनकर मंडळींना आवाहन

२०११ मध्ये ताम्हनकरांचा कुलवृत्तांत झाला. आज २०१९ मध्ये आपले संकेतस्थळ तयार झाले.
ताम्हनकर वंशवेल अद्ययावत करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

अलीकडच्या काळातील काही महत्त्वपूर्ण घटना

१. बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या आशियाई मानांकन स्पर्धेत बेला ताम्हनकर (मोहन रामचंद्र यांची नात) हिने उपांत्य फेरी गाठली.

२. सौ. पद्मजा जगन्नाथ ताम्हनकर यांचे दीर्घ आजाराने दि . २३ मे २०१९ रोजी निधन झाले.

सर्व ताम्हनकर परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

कल्याण येथील ताम्हनकर मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते कै.अनिल भास्कर ताम्हनकर यांचे वडील श्री.भास्कर दामोदर ताम्हनकर वयवर्षे ९२ यांचे काल दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

संपूर्ण ताम्हनकर परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

 


 
© www.tamhankarparivar.com
Developed By : Mrunal Atul Tamhankar