ताम्हनकर परिवार
चित्पावन कोण? चित्पावन ही संज्ञा कशी निर्माण झाली,याबद्दल मतमतांतरे आहेत. हिंदुधर्मात एकमेवाद्वितीय परब्रह्म वा परमात्मा हे अंतिम सत्य मानले आहे.हा परमात्मा सद्-चित -आनंद स्वरूप आहे. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे आत्म-ज्ञान -रूप अर्थात, स्वयंभू आणि आनंद म्हणजे ब्रम्हानंदरूप.मोक्ष हा आपला अंतिम पुरुषार्थ आहे. त्याची प्राप्ती आत्मज्ञानानं होते.मोक्षप्राप्तीसाठी आत्मज्ञानानं पावन झालेले ते चित्पावन.
ताम्हनकर नाव कसे पडले?
पूर्वी यज्ञ होत असत. त्यासाठी लागणारे साहित्य काही लोकांना आणायला सांगितले जायचे.त्याप्रमाणे ती मंडळी सर्व तयारी ठेवीत असत.पौरोहित्य करणारे, यज्ञातील अग्नीला अर्पण करणारे, त्या त्या वस्तूंचा उपयोग करीत असत.त्यावरून त्या मंडळींना संबोधले जाऊ लागले. जसे-
तांब्याच्या ताम्हनातून हवन द्रव्य ठेवून त्याचे अग्नीसमर्पण करणारे पुरोहित म्हणजे ताम्हनकर. ( चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांची कुळकथा -लेखक -डॉ .द.वि. जोग)
ताम्हनकरांचे मूळ पुरुष शांडिल्य ऋषी आहेत.
ताम्हनकर परिवाराचा कुलवृत्तांत डाउनलोड करण्यासाठी (ताम्हनकर कुलवृत्तांत) क्लिक करा
|